ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्त्याला RT-PCR चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांची मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. काही पोटनिवडणुकांचा निकालही यावेळी घोषित करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन केले जाणार आहे.
देशातील कोरोना उद्रेकाला कोरोना निवडणूक आयोग जबाबदार आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. आयोगाने 2 मे रोजी मतमोजणीसाठी कोणती तयारी केली, याचा प्लॅन सादर करावा, अन्यथा मतमोजणी थांबविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे खडे बोल मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने सुनावले होते. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी नवीन नियमावली सादर केली आहे. मतमोजणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांमध्ये एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. उमेदवाराला सोबत 2 पेक्षा जास्त व्यक्ती आणता येणार नाहीत. तसेच निवडणूक मिरवणूकीवर पूर्णपणे बंदी असेल.









