वार्ताहर / हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्यावतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचे आचरण करण्यात आले आहे. यानिमित्त संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत दैनंदिन पुजेला उपस्थिती दर्शविली आहे.
बलिदान मासानिमित्त कार्यकर्त्यांनी सालाबादाप्रमाणे कडक पूजेचे पालन केले असून, रोज रात्री 8 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर पूजेचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
तर युवा कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून स्वयंस्फूर्तीने बलिदान मासाचे पालन करत महाराजांच्या कार्याला मानवंदना दिली. या कार्यक्रमामुळे शिवप्रेमी व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.









