सातारा / प्रतिनिधी :
शाहुपूरी पोलिसांनी काशी विश्वेश्वर मंदिराजवळ टपरीत चालणाऱ्या मटका अड्डयावर छापा टाकून तीन जणांवर गुन्हा दाखल केला. राम सुभाष पवार (वय 39, रा. 587, मंगळवार पेठ), राजा अशोक सांडगे ( 26, रा. 317 मंगळवार पेठ), यासिन इकबाल शेख (रा. शनिवार पेठ) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून 2080 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी शाहुपूरी पोलीस अधिक तपास करत आहेत.









