लॉकडाऊनमुळे मासळीच्या विक्री मध्ये घट, केंद्र शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या पारंपरीक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने मच्छिमारांना मदत करावी अशी मागणी मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी केली आह़े केंद्रशासनाने नुकतेच मच्छिमारांना आर्थिक मदत देण्यासाठी जिह्याभरातील मच्छिमार संस्था कडून माहिती मागवली आह़े त्यानुसार हि मदत तत्काळ मिळाण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आह़े
लॉकडाऊनमुळे छोटय़ा मच्छिमारांचे हाल होत आह़े तालुक्यामधील बहुतांश मच्छिमारांकडे मासेमारी करता छोट्या नौका आहेत़ नौकामधून मासेमारीकरुन ही मासळी स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करुन छोटय़ा मच्छिमार उदरनिर्वाह करत असत़ो मात्र संचारबंदीमुळे बाजारामधील मासळी विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे मच्छिमार मेटाकूटीला आला आह़े तसेच कोरोनामुळे राज्य शासनाने मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे पैसेसुध्दा देण्यासाठी हात आखडते घेतल्यामुळे मच्छिमार हैराण झाला आह़े त्यातच मत्स्य विभाग अनधिकृत मासेमारी करणाऱया नौकांवर कारवाई करताना टाळाटाळ करत असल्यामुळे पारंपरीक मच्छिमार पुरता कोलमडून गेल्याचे वांदरकर यांनी सांगितल़े
मागील काही महिन्यांमधून अपेक्षित मासळी समुद्रामधून मिळत नाह़ी त्यातच काही परप्रांतीय नौका, एलईडी, पर्ससीन नौकां मासेमारी राजरोसपणे करत आहेत़ त्यामुळे पारंपरीक मच्छिमार हवालदील झाला आह़े त्यामुळे शासनाने मच्छिमारांना आर्थिक मदतीसह अनधिकृत एलईडी, पर्ससीन नौकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आह़े









