पेडणे / ( प्रतिनिधी )
मगो पक्षाने राज्यात 17 वर्षे राज्य केले त्यावेळी सर्वसामान्य माणसाला न्यायहक्क मिळवून देताना कसेल त्याची जमीन आणि राहिल त्याचे घर हा कायदा केला. त्याच धर्तीवर या मातीतल्या स्वाभिमानी मगो पक्षाला परत एकदा 21 आमदार द्या आणि गोवा सुजलाम सुफलाम करा असे आवाहन करून मोपा विमानतळावर सर्व प्रकारचे रोजगार पेडणेकरांनाचं मिळवून देण्याची ग्वाही मगोच्या आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मालपे येथे मगोच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रवीण आर्लेकर यांच्या मगोत प्रवेश कार्यक्रमात बोलताना आवाहान केले .
मालपे पेडणे येथे कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी मगोचे खजिनदार आपा तेली ,श्रीधर मांजरेकर ,युवा उद्योजक जित आरोलकर ,जिल्हा पंचायत उमेदवार आत्माराम धारगळकर ,प्रियांका महाले ,डॉक्टर केतन भाटिकर ,पंच राकेश स्वार ,सुदीप कोरगावकर ,राजेश कवळेकर ,चंद्रशेखर खडपकर ,तुकाराम हरमलकर , आदी उपस्थित होते .
स्वागत सूत्रसंचालन गौरेश पेडणेकर यांनी तर शर्मिला साळगावकर ,सादिशा आर्लेकर मृणाल पाडगावकर आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
ड़ आमदार सुदिन ढवळीकर यांनी बोलताना मगो पक्षाला इतिहास आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती पेडणे तालुक्मयातून करावी ,त्यापूर्वी मगोच्या पेडणे मतदारसंघातील आत्माराम धारगळकर व प्रियंका महाले या दोन्हीही जिल्हा पंचायत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले .
ड़ नरकासुराचा वध करा : सुदीन ढवळीकर
आमदार ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे नाव न घेता 2017 च्या विधानसभा निवडणुकीत चुकीचा उमेदवार दिला तो गद्दार ठरला आता दिवाळी जवळ आली आहे त्यापूर्वी नरकासुराचा वध करा , काँग्रेस पक्षाने असे अनेक नरकासुर उभे केले आहेत त्यातला हा एक नरकासुर असे सांगून या मातीतल्या पक्षासोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांचे अस्तित्व धोक्मयात आल्याचा दावा केला .
ड़ मगोने हाक्काची घरे दिली : सुदिन ढवळीकर
भाऊ साहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना मुंडकार कायदा केला म्हणूनच मुंडकरांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली असे ढवळीकर म्हणाले .
ड़ खायचे दात आणि दाखवसायचे दात वेगळे आहेत .
काँग्रेस पक्षाच्या सरकारने 2011 साली कोळसा आणला आता हीच मंडळी कोळसा नको आणि दुहेरी रेल्वे मार्ग नको म्हणून हट्टाहास करत आणि रस्त्यावर येतात .त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हे दिसून येते असे ढवळीकर म्हणाले .
सनबर्न विषयी मुख्यमंत्र्यांचे मौनव्रत
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सनबर्न होणार नाही म्हणतात मात्र मुख्यमंत्री यावर भाष्य करत नाहीत. त्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त करून मुख्यमंत्र्याने सनबर्न विषयी खुलासा करण्याची मागणी ढवळीकर यांनी केली .
ड़ लोकाची सेवा करण्याची आवडः प्रवीण आर्लेकर
मगो पक्षात प्रवेश केलेले प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना लोकांची सेवा करणे आपणास आवडते .आजपर्यंत पेडणेतून अनेक आमदार, मंत्री झाले मात्र विकास झाला नाही . या पुढे सिंहगर्जना करून परत एकदा मगोचा गट आणूया असे आवाहन केले .
ड़ जित आरोलकर
सामाजिक कार्यकर्ते जित आरोलकर यांनी सुरुवातीला मगो पक्षाची आणि जनतेची माफी मागताना 2017 च्या निवडणुकीत चुकीचा उमेदवार व आमदार दिल्याने आम्ही चुकलो ही चूक पुन्हा होणार नाही .आता त्यांना घरी जाण्याची योग्य वेळ पेडणेकर दाखवतील असा विश्वास व्यक्त करून सर्वसामान्यांत मिसळणारा प्रवीण आर्लेकर योग्य व्यक्ती आणि उमेदवार असल्याचे जाहीर केले.
ड़ भयमुक्त होऊयाः राकेश स्वार
यावेळी बोलताना राकेश स्वारा म्हणाले विद्यमान आमदार हे लोकांना दमदाटी करत असून पेडणे भयमुक्त करण्यासाठी आता यांचा दिवाळीच्या पूर्व संध्येला वध करून सुखाने नांदूया असे सांगितले .
यावेळी आपा तेली ,श्रीधर मांजरेकर ,आत्माराम धारगळकर ,चंद्रशेखर खडपकर आदींनी मनोगत व्यक्त केले . सूञसंचालन गौरेश पेडणेकर यांनी केले.तर आभार सुदीप कोरगावकर यांनी मानले.









