साध्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा
प्रतिनिधी / म्हापसा
कचरा व्यवस्थापन तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांचा वाढदिवस कोविडमुळे साध्या पद्धतीने घरी साध्या पद्धतीने घरातील मंडळी व काही ठराविक कार्यकर्ते व चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटन खात्याचे अध्यक्ष दयानंद सोपटे, आमदार ग्लेन टिकलो, सांगे आमदार प्रसाद गांवकर, आमदार रेजिनाल्ड आलेक्स, आवर्तिन फुर्तादो, पोलीस उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर, जिवबा दळवी, म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, तारक आरोलकर, सुधीर कांदोळकर, आनंद भाईडकर, शशांक नार्वेकर, अन्वी अमय, कांदोळी सरपंच ब्लेझ डिसौजा, हडफडे सरपंच राजेश मोरजकर, कळंगूट पंचसदस्य, जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, म्हापशाचे समाजसेवक डॉम्निक आल्फान्सो, पत्रकार तुषार टोपले, नारायण राठवड, तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर, जाहिरात व्यवस्थापक रवी पाटील, उपनिरीक्षक गौरीश गांवस, गोरख मांद्रेकर, आजी माजी नगरसेवक, विविध खात्याचे अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री मयाकल लोबो यांचे अभिनंदन करीत आपल्या मंत्री मंडळातील एक सदैव विकासासाठी धडपडणारे मंत्री असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. पर्रा गावच्या सरपंच तथा लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनी स्वागत केले व सर्वांचे आभार मानले.
सर्वांनी जीवाची काळजी घ्यावी- मंत्री लोबो
मंत्री मायकल लोबो यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वांनी आपल्यावर सदैव प्रेम केले आहे त्या सर्वांच्या प्रेमापोटी आपण आमदार नंतर मंत्री झाल्याचे स्पष्ट केले. सर्वांनी आपल्यास सदैव सहकार्य केले त्यात पत्रकारांची कामगिरीही महत्त्वाची असल्याची माहिती यावेळी मंत्री लोबो यांनी दिली. राज्यात अद्याप कोविड पूर्णपणे बरा झाला नसून सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे म्हणत सर्वांचे आभार मानले.









