प्रतिनिधी / बेळगाव
सीमाप्रश्नाला बळकटी मिळून सीमाभागात मराठी भाषा व अस्मितेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शुभम शेळके यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. सोमवारी मंडोळी, सावगाव, हंगरगा या गावांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यामध्ये शेकडोंच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. पहिल्यांदाच तरुणांच्या हाती नेतृत्व दिल्याने तरुणांमध्ये जोश पसरल्याचे या प्रचारफेऱयांमधून दिसून आले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे तिन्ही गावांमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फलकांवर पाठिंब्याचे संदेश लिहिले होते. म. ए. समितीचा खासदार दिल्लीत पाठविणारच असे फलक लक्षवेधी ठरत होते. मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहचणे आवश्यक असल्याने मताधिक्क्मयाने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
तालुका म.ए.समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेळगाव तालुक्मयातील समस्त मतदारांनी शेळके यांना आपले बहुमोल मत देऊन सीमा लढय़ाला बळकटी आणावी व त्यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत, असा ठराव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे उपाध्यक्ष सुरेश डुकरे होते.
लोकसभा पोटनिवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून सीमालढय़ातील एक महत्त्वाचा भाग आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या मार्गाने या सीमा लढय़ात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे शुभम शेळके यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले. सीमा लढय़ाला बळकटी देण्यासाठी शेळके यांना लोकसभेत पाठवा, असे उपाध्यक्ष सुरेश डुकरे यांनी सांगितले. या बैठकीला पिराजी मुचंडीकर, अशोक पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, निंगाप्पा देसुरकर, लक्ष्मण खांडेकर, शट्टुप्पा चव्हाण, पुंडलिक मोरे, नामदेव सांबरेकर, कृष्णा पाटील, बाळू इंगळे, यल्लाप्पा जायण्णाचे, रोहित पाटील, जोतिबा उचगावकर, यशवंत मोरे यांच्यासह इतर उपस्थित होते.









