सावंतवाडी/प्रतिनिधी-
एसटी बसेस सुरू व्हाव्यात, लालपरी पुन्हा रस्त्यावर यावी, प्रवाशांना लालपरी ची सेवा मिळावी आणि एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली निघावा या जनजागृतीसाठी मंडणगड येथील चालक विलास दगडू पाटील यांनी मोटरसायकल ची एसटी बस तयार करून त्याने आतापर्यंत 14 एसटी डेपोंना भेटी दिल्या आहेत. सावंतवाडी एसटी डेपोला त्याने आज (शुक्रवारी) भेट देऊन प्रवासी आणि वाहक-चालक यांच्याशी सुसंवाद साधला या एसटी चालकाचा हा मोटरसायकल वरील एसटी लूकचा प्रवास अनोखा म्हणावा लागेल.









