मंडणगड/ प्रतिनिधी
रत्नागिरी जिह्यातून झारखंड राज्यातील मजुकरांकरिता मंगळवारी चिपळूण रेल्वे स्थानकातून रेल्वेगाडी मार्गस्थ झाली. यात मंडणगड तालुक्यातील 128 परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठी रेल्वे प्रवासात सहभागी झाले. स्थानीक प्रशासन व मंडणगड आगाराच्यावतीने या नागरिकांच्या चिपळूण येथील प्रवासाची सोय मोफत करण्यात आली होती.
मंडणगड बसस्थानाकातून सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास 6 गाडय़ा चिपळूण रेल्वे स्थानकात सोडण्यात आल्या. यावेळी सर्व तपासण्या करुन पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी आगार व्यवस्थापक हुनमंत फडतरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. नागपुरे, पोलीस उपनिरीक्षक वराळे यांच्यासह आरोग्य विभाग व मंडणगड आगाराचे कर्मचारी उपस्थित होते.









