पृथ्वीच्या शेजारीच असणाऱया मंगळ या ग्रहावर कधीकाळी जीवन होते की नाही? यावर शास्त्रज्ञांमध्ये बरीच वादावादी सुरू असते. काही जणांच्या मते मंगळ हा भविष्यकाळात मानवी जीवनासाठी अनुकूल बनविता येऊ शकतो. मात्र, सध्या तरी तेथे तेथील नैसर्गिक स्थितीनुसार सजीवांचे अस्तित्व अशक्मय आहे, असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. तथापि, चीनच्या ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. शिनली वेई तसेच हॉर्वर्ड संशोधन संस्थेचे अवकाशशास्त्रज्ञ डॉ. रुडॉल्फ शिल्ड यांच्या म्हणण्यानुसार मंगळावर विशिष्ट प्रकारच्या अळंब्या (मश्रुम) उगवतात. त्यांच्या या दाव्याला स्पेस टायगर किंग मानले जाणारे डॉ. रॉन गॅब्रिएल जोसेफ यांनीही दुजोरा दिला आहे.
अभ्यासातून असे दिसून आले आहे, की मंगळावर पांढऱया रंगाचे जे खडक दिसतात त्या वस्तूतः मोठय़ा आकाराच्या अळंब्या आहेत. अळंबी विशिष्ट प्रकारच्या बुरशीपासून बनते. ही बुरशी (फंगस) मंगळावर मोठय़ा प्रमाणात तयार होते. त्यामुळेच अळंब्यांचे मोठे खडक तेथे बनलेले दिसतात.
ब्रिटनमध्ये यावर काही प्रयोग झाले असून मंगळासारखे वातावरण काही संशोधकांनी प्रयोगशाळेत तयार केले आहे. कार्बनडायऑक्मसॉईड या वायुचा बर्फ आणि इतर काही पदार्थ मिळून मंगळासारखा पृ÷भाग तयार करण्यात आला आहे. या पृ÷भागावर बुरशी निर्माण होऊ शकते, असे दिसून आले आहे. त्यामुळे मंगळावर अळंब्या उगवू शकतात, हा काही संशोधकांचा दावा कदाचित खरा असू शकतो, असेही मानले जाऊ लागले आहे. या अळंब्या मात्र मानवाने खाण्यायोग्य नसतात. त्या विषारी असू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.









