वृत्तसंस्था/ लंडन
शनिवारी येथील वेम्बली स्टेडियमवर झालेल्या एफए चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात पिएरी इमरीक ऑबेमेंयांगने नोंदविलेल्या शानदार दोन गोलांच्या जोरावर अर्सेनल संघाने विद्यमान विजेत्या मँचेस्टर सिटीला 2-0 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत विक्रमी 21 व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
आता या स्पर्धेत चेल्सी आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर अर्सेनलचा अंतिम सामना 1 ऑगस्ट रोजी खेळविला जाईल. शनिवारच्या सामन्यात पिएरी इमरीकने खेळाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल नोंदविला. सहा वर्षांपूर्वी या स्पर्धेत ऍरटेटाच्या नेतृत्वाखाली अर्सेनल संघाने मोठा विजय मिळविला होता. अर्सेनलला गेल्या सात लढतीमध्ये मँचेस्टर सिटीकडून पराभव पत्करावा लागला होता.









