वृत्तसंस्था/ ब्रिग्टन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने ब्राईटनचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले.
शनिवारच्या सामन्यात मँचेस्टर सिटीचा हुकूमी स्ट्रायकर रहिम स्टर्लिंगने शानदार हॅट्ट्रिक नोंदविली. स्टर्लिंगने मँचेस्टर सिटीतर्फे चालू वषीच्या प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात आपला 25 वा गोल नोंदविला. अल्जेरियाच्या रहिम स्टर्लिंगने गॅब्रिएल जोशुआच्या पासवर मँचेस्टर सिटीचे आणि वैयक्तिक खाते उघडले. ऍग्युरोने मध्यांतरापूर्वी मँचेस्टर सिटीचा दुसरा गोल केला. ऍग्युरोचा या फुटबॉल हंगामातील हा विसावा गोल ठरला. खेळाच्या उत्तरार्धात स्टर्लिंगने दोन गोल केले. मेराझने मँचेस्टरचा पाचवा गोल नोंदवून ब्राईटनचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.









