वार्ताहर / मालवण:
वजन काटे, इलेक्ट्रिक काटे व इतर यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन करण्यासाठी भेडशी व दोडामार्ग येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. भेडशी येथील व्यापाऱयांनी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तर दोडामार्ग येथील व्यापाऱयांनी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कॅम्पला उपस्थित राहवे, असे आवाहन वैद्य मापन शास्त्र निरीक्षकांनी केले आहे.









