वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2020 साली होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट भारतीय हॉकी संघाने यापूर्वीच मिळविले आहे. आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेकरिता भारतीय हॉकी संघाच्या पूर्व तयारीला प्रारंभ होत आहे. येथे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताचा सामना शनिवारी तृतीय मानांकित हॉलंड संघाबरोबर होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची ही तिसरी प्रो लीग हॉकी स्पर्धा आहे. पहिल्या प्रो लिग स्पर्धेत भारतीय हॉकी संघ सहभागी झाला नव्हता. येथील कलिंगा स्टेडियमवर यजमान भारत आणि हॉलंड यांच्यात दोन सामने होणार आहेत. उभय संघातील दुसरा सामना येत्या रविवारी होणार आहे. प्रो लीग हॉकी स्पर्धेत जगातील अव्वल संघ सहभागी होत आहेत. भारतीय हॉकी संघाचे पुढील दोन सामने विश्व विजेत्या बेल्जियम बरोबर 8 व 9 फेब्ा्रgवारीला होणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन सामने 22 व 23 फेब्ा्रgवारीला आयोजित केले आहेत.









