वृत्तसंस्था/ बेंगळूर
मस्कतमध्ये 21 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱया महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय महिला संघाने रविवारी ओमानला प्रयाण केले. या स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी संघ विद्यमान विजेता आहे.
मस्कतमध्ये होणाऱया आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारत, चीन, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलँड या संघांचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविताकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना 21 जानेवारीला मलेशियाबरोबर होणार आहे.









