वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येनंतर पहिल्यांदाच तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर भारताचा वरि÷ महिला फुटबॉल संघ तुर्कीमध्ये काही मित्रत्वाचे फुटबॉल सामने खेळणार आहे.
भारतीय वरि÷ महिला फुटबॉल संघाचे तुर्कीमध्ये तीन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे फुटबॉल सामने होणार आहेत. या सामन्यांना 17 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. भारत आणि सर्बिया यांच्यातील पहिला मित्रत्वाचा सामना 17 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर 19 फेब्रुवारीला भारताचा दुसरा सामना रशियाबरोबर तर तिसरा आणि शेवटचा सामना 23 फेब्रुवारीला युपेनबरोबर होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय महिला फुटबॉल संघाचा गोव्यामध्ये कसून सराव सुरू होता. 2022 च्या जानेवारी महिन्यात महिलांची आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा भारतात होणार आहे. सदर स्पर्धा 20 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाचा तुर्की दौरा सरावाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. 2022 सालातील फिफाची 17 वर्षाखालील वयोगटातील महिलांची फुटबॉल स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे.









