रत्नागिरीसह ठाणे व भंडारा जिह्यामध्ये आढळला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
युरोपात आढळणारा कोळीसदृश दिसणारा किटक रत्नागिरीमधील काही किल्ल्यावंर आढळल्याची नोंद भारतीय प्राणीशास्त्र सर्व्हेक्षण संस्थेने केली आह़े या प्रजातीला (जिम्नोडॅमेयस ग्लेबर) असे शास्त्राrय नाव देण्यात आले आह़े हा किटक रत्नागिरीव्यतिरिक्त ठाणे, भंडारा येथेही आढळून आला आह़े
या किटक काहीसा कोळ्याप्रमाणे दिसणारा असून याच्या पायाची रचना इतर कोळ्यांप्रमाणे नसल्याचे संशोधनातून दिसून आले आह़े त्यामुळे या नव्या प्रजातीच्या शरीररचनेबाबत संशोधन प्राणीशास्त्र विभाग करत आह़े भारतात आढळणाऱया नेहमीच्या कोळ्यांपेक्षा या किटकाचे पाय मोठे आहेत़ मोठय़ा पायामुळे उडय़ा मारात चालणे इत्यादी वैशिष्टय़े या नव्या प्रजातीमध्ये असल्याचे किटक संशोधक ड़ॉ मधुरा तेंडुलकर यांनी सांगितल़े तसेच हा किटक रत्नागिरीनजीकच्या समुद्रकिनाऱयाजवळील किल्ल्यांवर आढळून आला आह़े सह्याद्रीजवळील अभयारण्यातही प्राणीशास्त्र सर्व्हेक्षण संस्थेने वेगवेगळय़ा नव्या प्रजातींच्या शोध लावला आह़े यामध्ये सोनेरी पाठीच्या बेडकाची नवी प्रजाती सापडली आह़े जगभरात एकूण 368 नव्या जीव प्रजातींचा शोध लावण्यात आला. यामध्ये भारतातील 116 नवीन प्रजातींचा समावेश आह़े मात्र भारतातील या नव्या प्रजातींपैकी पश्चिम घाटामधून केवळ एकाच प्रजातीचा शोध लागला आह़े
या (जिम्नोडॅमेयस ग्लेबर) किटकावर अधिकचे संशोधन सुरु असून याच्या अधिवासाबद्दल अधिक संशोधन करत करण्यात येत आह़े सर्वसामान्य आढळणारा कोळय़ापेक्षा या प्रजातीची शरीररचना पूर्णत: वेगळी आह़े त्यामुळे या नव्या प्रजातीचे शरीररचनेचेही संशोधन सुरु असल्याचे किटक अभ्यासक ड़ॉ मधुरा तेंडुलकर यांनी सांगितल़े
नव्या किटक प्रजातीचा अभ्यास सुरु
या नव्या किटक प्रजातीचा अभ्यास सुरु आह़े संशोधनाअंती या नव्या प्रजातीबद्दल माहिती मिळणार आह़े साधारण कोळ्य़ाप्रमाणे दिसणारा हा किटक मात्र कोळ्यांच्या प्रजातीपैकी नाही, असे प्राथमिक संशोधनाअंती दिसत आह़े