वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय हॉकी प्रशिक्षकासाठी आंतरराष्ट्रीय हॉकीफेडरेशनच्या मान्यतेने हॉकी इंडियातर्फे सोमवारपासून ऑनलाईनद्वारे लेव्हल-1 प्रशिक्षण सराव शिबिराला प्रारंभ करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी तज्ञातर्फे हे सरावाचे शिबीर ऑनलाईनद्वारे भारतीय हॉकी प्रशिक्षकासाठी घेतले जाणार आहे. हॉकी इंडिया लेव्हल-2 प्रशिक्षक म्हणून अद्याप अधिकृत मान्यता नसलेल्या हॉकी प्रशिक्षकांना या सराव शिबिरात भाग घेता येईल. आतापर्यंत एकूण 9 हॉकी प्रशिक्षकांनी या शिबिरासाठी आपली नावे हॉकी इंडियाकडे नोंदविली आहेत. सदर ऑनलाईन सराव शिबीर 11 ते 15 मे दरम्यान घेतले जाईल, असे हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.









