चिनी गुंतवणुकदाराला दूर करणार दक्षिण कोरियन कंपनी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पबजी कॉर्पोरेशन या दक्षिण कोरियाच्या कंपनीने स्वतःचा लोकप्रिय गेम प्लेयरअननोन बॅटलग्राउंड्स (पबजी) पुन्हा भारतात सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या पुनरागमनासाठी पबजी कॉर्पोरेशनने टेंसेंट या चिनी कंपनीशी असलेले नाते तोडले आहे. चिनी कंपनीचे गेम्सचे पब्लिश राइट्स संपुष्टात आणल्याचे पबजी कॉर्पोरेशनने एका ब्लॉगमध्ये म्हटले अहे. टेंसेंट गेम्ससोबत गुंतवणूक समवेत उर्वरित संबंधही कंपनी संपुष्टात आणणार असल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 2 सप्टेंबर रोजी चीनच्या कंपन्यांशी संबंधित 118 ऍप्सवर बंदी घातली होती. यात लोकप्रिय गेम पबजी देखील सामील होता. या ऍप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. सरकारने पबजीच्या मोबाईल वर्जनवर बंदी घातली होती.
बदललेल्या स्थितीत कंपनीने पबजी मोबाइल प्रेंचाइजीची पब्लिशिंग जबाबदारी स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील वापरकर्त्यांना पबजी सारखा अनुभव देण्याच्या पर्यायावर काम करत आहोत. वापरकर्त्यांना एक उत्तम गेमप्ले अनुभव देण्याचा पूर्ण प्रयत्न असल्याचे पबजी कॉर्पोरेशनने स्वतःच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.
पबजी गेम दक्षिण कोरियाच्या पबजी कॉर्पोरेशनने विकसित केला आहे. हा गेम संगणक, एक्सबॉक्स आणि प्लेस्टेशनवर आहे. परंतु या गेमचे मोबाईल वर्जन चिनी कंपनी टेंसेंट होल्डिंग्सची सहकारी कंपनी टेंसेंट गेम्ससोबत मिळून केले आहे. मोबाईलवर पबजीच्या फुल-फ्लॅग आणि लाइट वेरिएंट उपलब्ध आहेत.
भारतात पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटवर बंदी घालण्यात आली आहे. पबजी कॉर्पोरेशन भारत सरकारकडून घालण्यात आलेल्या बंदीचा आदर करते. वापरकर्त्यांच्या डाटाची सुरक्षा कंपनीसाठी सर्वोच्च आहे. आम्ही भारत सरकारसोबत मिळून समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे पबजी कॉर्पोरेशनने म्हटले आहे.
भारतात 17.5 कोटीवेळा डाउनलोड
पबजी जगात सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या गेम्सच्या यादीत आघाडीच्या 5 मध्ये सामील आहे. सेंसर टॉवरच्या अहवालानुसार जगभरात पबजीला 73 कोटीपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आला आहे. यात 17.5 कोटीवेळा म्हणजेच 24 टक्केवेळा भारतीयांनी डाउनलोड केले आहे. या हिशेबाने पबजी खेळणाऱया प्रत्येक 4 पैकी एक भारतीय आहे.
सर्वाधिक महसूल
गेमिंगच्या जगात सर्वाधिक उत्पन्न मिळविणारा गेम पबजी ठरला आहे. पबजीने आतापर्यंत 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23 हजार 745 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पबजीचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्न चीनमधून येते. जुलैमध्ये पबजीने 208 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळविले आह. म्हणजेच जुलैमध्ये पबजीने दरदिनी 50 कोटी रुपये कमाविले आहेत.
अक्षय कुमारचा नवा गेम पबजीवर बंदी घातल्यावर अनेक देशी कंपन्यांनी अशाचप्रकारचा गेम आणण्याची तयारी आहे. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पबजीच्या धर्तीवर एफएयू-जी गेम सादर करण्याची घोषणा केली आहे. अक्षयने स्वतःच्या या गेमचे पोस्टरही प्रसारित केले आहे. हा गेम ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होऊ शकतो.









