इस्लामाबाद, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’कडे संशयाची सुई असून याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला होता. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तान दुतावासातील प्रभारी राजदुतांना पाचारण करून दबाव निर्माण केल्यानंतर अखेर त्या दोन्ही अधिकाऱयांची सुटका करण्यात आली आहे. रस्ते अपघात घडवल्याच्या आरोपावरून दोघांवरही अटकेची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या माध्यमातून पाकिस्तानचा बनाव उघड झाला आहे.
भारतीय दुतावासातील दोन अधिकारी सोमवारी सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पुन्हा न परतल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. सीआयएसएफचे दोन अधिकारी डय़ुटीवर बाहेर जात होते. मात्र, ते आपल्या ठिकाणावर पोहचण्याआधीच बेपत्ता झाले. त्यांच्या अपहरणाचीही शक्मयता व्यक्त केली जात होती. दुतावासाने यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन भारतीय अधिकाऱयांचा मुद्दा तातडीने पाकिस्तानकडे उपस्थित केला. मात्र पाकिस्तानकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र, भारतीय यंत्रणांकडून पाकिस्तानवर दबाव टाकला गेल्यानंतर रात्री उशिराने दोन्ही अधिकाऱयांची सुटका करण्यात आली. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे भारतीय दुतावास कार्यालयात सदर अधिकारी कार्यरत होते.
यापूर्वीही पाकिस्तानचे छुपे कारनामे
गेल्या दोन महिन्यांमध्येच अनेकवेळा असा प्रकार घडला आहे. एका घटनेत भारतीय दुतावासातील ज्ये÷ अधिकारी गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मार्च महिन्यापासूनच अनेक भारतीय अधिकाऱयांना पाकिस्तानने असा विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आहे. आता आणखी दोन अधिकारी बेपत्ता होण्याच्या घटनेने द्विपक्षीय तणावात आणखीनच भर पडली आहे.
भारताने उधळला होता हेरगिरीचा डाव
काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानच्या हेरगिरीचा डाव दिल्लीत हाणून पाडला. पाकिस्तानी उच्चायोगामध्ये काम करणारे दोन कर्मचारी आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे कळल्यावर भारताने हा डाव तातडीने हाणून पाडला होता. भारतीय लष्करी साहित्याची आखणी नेमकी कशी होत असते याचा आराखडा गुप्त पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न हे दोघे करत होते. पण हा कट उघडकीस आल्यानंतर त्यांना 24 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्ली : कोविड-19 संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली.









