मुंबई
भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ कोरोना महामारीचा परिणाम झेलावा लागला आहे. फिच रेटिंगने 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 11 टक्के वाढीची नोंद करेल असा अंदाज वर्तवला आहे. पण त्यानंतर 2022-23 ते 2025-26 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर 6.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात मंदीची स्थिती गंभीर बनली असून कडक लॉकडाऊन आणि मर्यादीत वित्तसहाय्यामुळे अशी स्थिती बनल्याचे फिचने म्हटले आहे. आता अर्थव्यवस्था रूळावर येते आहे. पुढच्या काही महिन्यात कोरोनाशी लढणाऱया लसी दाखल होणार असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. 2020-21 आर्थिक वर्षात जीडीपी 9.4 टक्क्यापर्यंत घसरू शकतो, असाही अंदाज फिचने वर्तवला आहे.









