वार्ताहर/ किणये
तालुक्यात सध्या भातपीक बहरून आले आहे. या पिकात कोळपणीच्या कामासह युरिया खताची फवारणी शेतकरी करतानाचे चित्र पहावायस मिळत आहे. भातपीक बहरून येत असले तरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.
बहुतांशी भागातील शिवारांमध्ये भातरोप लागवड करण्यात आली आहे. काही मोजक्याच शेतशिवारात रोप लागवड करण्यात येत असून ही लागवडही आता अंतिम टप्प्यात आहे.
इंद्रायणी, बासुमती, मधुरा, सोना मसुरा, इंटाण, दोडगा, सुगंधा आदींसह काही नवीन जातीची भात पिके घेण्यात आली आहेत. पेरणी केलेल्या भाताचीही बऱयापैकी उगवण झाली असून या पिकात दोन ते तीन वेळा कोळपणी केली आहे. भात पिकामध्ये सध्या महिला भांगलण करीत आहेत. गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी लागवड करण्यात आलेल्या भात पिकांत युरियाची फवारणी करण्यात येत आहे. सध्या बऱयाच शिवारातील पाणी कमी झाले आहे. यामुळे भात पिकासह इतर पिकांसाठी मोठय़ा पावसाची गरज आहे, असे काही शेतकऱयांनी सांगितले.









