सांगली / प्रतिनिधी
भाजपा महिला मोर्चा, जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांकरीता “सोशल मिडिया प्रशिक्षण शिबीर” याचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटन भाजपाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे यांच्या हस्ते केदार खाडीलकर, संकेत कुलकर्णी, निलेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरामध्ये कु. दिशा दुग्गाणी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेविका सविता मदने, लक्ष्मी सरगर, उर्मिला बेलवलकर, नसिमा नाईक, अप्सरा वायदंडे, गीतांजली ढोपे-पाटील यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








