जौनपूरमध्ये शिवपाल यादवांची टीका
जौनपूरमध्ये बुधवारी समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारकांची फौज उतरली होती. एकीकडे अखिलेश यादव जाहीरसभांना संबोधित करत होते. तर दुसरीकडे त्यांच काका शिवपाल यादव यांनीही सप उमेदवारांसाठी प्रचार केला आहे. मल्हनी मतदारसंघात शिवपाल यांनी प्रचारसभेत बोलताना भाजपला लक्ष्य केले.
भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याचा विकास रखडला आहे. राज्यातील शेतकरी, बेरोजगार, व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. नोटाबंदीमुळे गुजरातच्या दोन भांडवलदारांचा लाभ झाला. यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट होणार असल्याचा दावा शिवपाल यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन व्यवस्था, समाजवादी पेन्शन पुन्हा सुरू केली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकी एका युवक-युवतीला सरकारी नोकरी देण्यात येईल असे ते म्हणाले.
शिवपाल यांनी संजद उमेदवार धनंजय सिंह यांचे नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मल्हनीत माफिया आहे, त्याला मल्हनीत राहू देऊ नये. मल्हनी आणि जौनपूरमध्ये अराजकता निर्माण होऊ देणार नाही. अराजकता फैलावणारे आणि गुंडगिरी करणाऱयांना मल्हनीमधून पळवून लावू असे शिवपाल यांनी म्हटले आहे.









