प्रतिनिधी/ रत्नागिरी
भरधाव वेगाने मालवाहतुकीचा ट्रक चालवून चारचाकी वाहनाला धडक दिल्याप्रकरणी मालवाहतूक करणाऱया चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े हा अपघात रविवार 17 रोजी सकाळी 8 च्या दरम्यान हातखंबा गावातील तीव्र वळणार झाल़ा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ट्रकचालक संतोष लालसिंग जाधव (29, ऱा आहेरी लमाणी तांडा, ज़ि विजापूर) हा मालवाहक ट्रक (केए-28-डी-0755) घेवून गोवा ते मुंबई असा घेवून जात होत़ा दरम्यान हातखंबा गावातील तीव्र उतारावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव ट्रक दादर ते गोवा अशा जाणाऱया इर्टीगा कारला (एमएच 01-डीई-3094) जोरदार धडक दिल़ी सुदैवाने इर्टीगा कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाह़ी या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झगडे यांनी फिर्याद दाखल केली.









