प्रतिनिधी/ रत्नागिरी
भक्ष्याच्या शोधात बिबटय़ा मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथे बिबटय़ा भक्ष्य शोधण्याच्या नादात चक्क पेट्रोल पंपात शिरला. पेट्रोल पंपाबाहेर असलेल्या कुत्र्यावर बिबटय़ाने झडप घातली. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपाच्या केबिनमधील रात्रपाळीतील कर्मचाऱयाने पहिल्यानंतर त्याची चांगलीच हबेलहंडी उडाली. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान झालेली ही घटना पॅमेरात कैद झाली आहे.
अलिकडे भक्ष्याच्या शोधार्थ बिबटय़ाचे मानवी वस्तीमध्ये घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातही घबराटीचे वातावरण आहे. अशाच वेळी मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी पेट्रोल पंपात मंगळवारी घडलेल्या घटनेने सारेच हादरले. पहाटे बिबटय़ाने भक्ष्याच्या शोधात प्रवेश केला. त्यानंतर पंपात असणाऱया कुत्र्यावर झडप घालून बिबटय़ाने तेथून पलायन केले. हा सर्व प्रकार पंपातील सीसीटिव्हित कैद झाला आहे. आता सोशल मिडियावर या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.









