ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन एप्रिलच्या अखेरीस भारताचा दौरा करणार आहेत. जॉन्सन यांचा हा दौरा युरोपियन युनियनपासून विभक्त झाल्यानंतरचा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
जॉन्सन यांच्या भारत दौऱ्याचा मुख्य उद्देश यूकेसाठी अधिक नवीन संधी शोधण्याचा तसेच भारताला सोबत घेऊन चीनच्या डावपेचांच्या विरोधात उभे राहणे हा आहे.
दरम्यान, 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जॉन्सन यांना भारतात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला होता.