ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांवरून झालेल्या मतभेदानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनॅरो यांनी लुईस हेन्रिक मँडेट्टा यांची आरोग्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांपासून ब्राझीलमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यासाठी मँडेट्टा यांनी काही उपाय सुचविले होते. ते उपाय देशातील अनेक राज्यांच्या गव्हर्नरांनी राबवले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्यानंतरअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कोविड-19 वरील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. ऍन्थोनी फौसी यांनीसुचवलेल्या उपायांशी मँडेट्टा यांच्या उपायांची तुलना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या मतभेदातून बोल्सोनॅरो यांनी मँडेटा यांची पदावरून हकालपट्टी केली.









