प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे ट्रक-बोलेरोच्या धडकेत एकजण ठार झाल़ा ही घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडल़ी अमीर एकनाथ मडव (28, ऱा नाचणे, रत्नागिरी) असे अपघात मृत झालेल्याचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीर मडव हा रविवारी रात्री बोलेरो गाडी (एमएच 07 एजे 0326) घेवून मुंबई-गोवा महार्मावरून जात होत़ा हातखंबा येथील निरंकारी सत्संग भवन येथील वळणावर समोरून येणारा ट्रक (एमएच 09 सीयू 6775) याला बोलेरो गाडीची जोरदार धडक बसल़ी या अपघातात अमीर याचा मृत्यू झाल़ा तसेच दोन्ही गाडय़ांचे मोठे नुकसान झाले आह़े या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल झगडे करत आहेत़









