युद्धक्षेत्रात महिलेने जिंकली लोकांची मने
जेव्हा दोन मने जुळायची असतात, तेव्हा त्यांना जगातील कुठलीच शक्ती रोखू शकत नाही. मग बॉम्बवर्षावाची स्थिती का असेना. रशियाच्या क्षेपणास्त्रांच्या माऱयादरम्यान युक्रेनमध्ये एकीकडे दहशतीचे वातावरण असताना एका जोडप्याने रविवारी विवाह केला आहे. या जोडप्याच्या साहसाचे सर्वांकडून कौतुक करत आहे. हे दांपत्य आता रशियाच्या विरोधात देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ तैनात आहे. युक्रेनची राजधानी कीव्हनजीकच हे दांपत्य देशाच्या रक्षणार्थ उभे ठाकले आहे. छायाचित्रांमध्ये महिला सैन्याच्या गणवेशात दिसून येते.

या दांपत्याचे नाव लेसिया आणि वेलेरी आहे. दोघांनी कीव्हमध्ये युद्धक्षेत्रानजीक विवाह केला आहे. दोघेही युक्रेनच्या क्षेत्रीय संरक्षण दलात कार्यरत आहेत. कीव्हमध्ये चहुबाजूने रशिया हल्ले करत आहेत. तेथे कुठल्याही क्षण जीवघेण्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे. लेसिया आणि वेलेरी यांना सहकारी सैनिकांनी गिटार वाजवून आणि गाणे म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
युक्रेनवर रशियाने आतापर्यंत 600 क्षेपणास्त्रs डागली आहेत. तेथे मृत्यू कधी आणि कुठल्या दिशेने येईल हे कुणीच जाणत नाही. अशा स्थितीतही ज्या हिमतीने या जोडप्याने युद्धादरम्यान विवाह केला ते पाहता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.









