व्यायाम करायचं मनावर घेतलं तर तो घरीही करता येतो आणि त्यासाठी महागडय़ा साधनांची गरज नसते. घरातल्या साध्या वस्तूही व्यायामाचे साधन बनू शकतात. उदाहणार्थ पाण्याच्या अर्धा लिटरच्या बाटल्या, पाण्याच्या भरलेल्या बाटल्या घेऊनही व्यायाम करता येतात.
यासाठी दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन सरळ उभं राहावं.
हात कोपरापासून खांद्यापर्यंत वाकवावेत. असं 12-26 वेळा करावं. ही कृती दोनदा करावी. त्यानंतर उजव्या बाजूला थोडं वाकून पुन्हा पूर्वस्थितीत यावं. मग हीच कृती डाव्या बाजूनेही करावी.
कोणत्याही व्यायामाच्या सुरूवातीला पाच मिनटं चालन अथवा मशिनवर वॉर्म अप घ्यावा.
सुरूवातीला आठवडय़ातून तीन वेळा एक दिवसाआड व्यायाम करावा. म्हणजे व्यायामाचा कंटाळा येत नाही आणि त्यात सातत्य राखणं सोपं जातं.