मराठा युवक संघातर्फे आयोजन
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
मराठा युवक संघ आयोजित 55 वी बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार दि. 26 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज, खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबई यांच्या नियमानुसार सात वजनी गटात घेण्यात येणार आहे. बेळगाव श्री विजेत्याला मानाचा किताब, रोख 15 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पोझरला 5 हजार रूपये रोख, किताब व चषक देण्यात येणार आहे. टीम चॅम्पियनशिपसाठी 5 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील 5 विजेत्यांना रोख रक्कम, पदके, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. एस. के सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ रोलिंग चषक ईश्वर सिद्दण्णावर यांच्याकडून देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, एमएलसी महांतेश कवटगीमठ, डीसीपी चंद्रशेकर निलगार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते संजय सुंठकर, शिवाजी हंगिरगेकर, सिद्धार्थ हुंदरे, दिगंबर पवार, प्रदीप अष्टेकर, संजय मोरे, शिवाजी हंडे, सुधीर दरेकर, सदानंद शिंदोळकर, धनंजय पटेल, मोहन बेळगुंदकर, रणजित मन्नोळकर, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठा युवक संघाची स्थापना कै. एल. आर. पाटील व आप्पासाहेब पवार यांनी 1966 साली करून संघाची भव्य वास्तू उभी केली. बेळगावातील तरुण पिढीत व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी बेळगाव श्री व बेळगाव हक्मर्यूलस, बेळगाव कुमार अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मि. इंडिया, मि. साऊथ इंडिया अशा मोठय़ा स्पर्धाही भरविण्यात आल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, मारूती देवगेकर, दिनकर घोरपडे, अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., नेताजी जाधव, किरण पाटील, शिवाजी हंगिरगेकर, लक्ष्मण होनगेकर, संजय मोरे, रमेश पावले, विजय बोंगाळे, सुनील भोसले, सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर, पांडुरंग जाधव, बंडू मजुकर, दिगंबर पवार, शेखर हंडे, प्रभाकर कडोलकर, श्रीकांत देसाई, मोहन सप्रे व विश्वास पवार आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.









