प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे विमान प्रवास ठप्प झाला होता. याचा मोठा फटका विमान उद्योगाला बसला. तरीही लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर बेळगाव विमानतळाने मोठी गरुडझेप घेतली आहे. प्रवासी संख्येत राज्यात दुसऱया क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एप्रिल महिन्यात शून्य प्रवासी असणाऱया या विमानतळाने ऑगस्टमध्ये 17 हजार 917 प्रवासी संख्या गाठली आहे.
26 मेपासून बेळगावमधून विमानसेवेला पुन्हा प्रारंभ झाला. आतापर्यंत एकूण 58 हजार 500 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. मे महिन्याच्या अखेरीला सुरू झालेल्या विमानसेवेने त्या महिन्यात 439 प्रवासी, जून महिन्यात 9 हजार 811, जुलैमध्ये 14 हजार 162 प्रवाशांनी प्रवास केला होता. प्रवासी संख्येत बेळगावचा आलेख हा वाढत चालला आहे.









