वार्ताहर / उचगाव
बेळगाव तालुक्यामध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम रविवार दि. 19 रोजी पार पडला. 12 प्राथमिक केंद्रामध्ये 0 ते 5 वर्षे गटातील 41262 बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला. तालुक्यात पल्स पोलिओ कार्यक्रम 96 टक्के यशस्वी करण्यात आला.
बेळगाव तालुक्यातील बारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला. सीसीबी कमिशनर जगदीश, डॉ. नरहट्टी, डॉ. मुनियाळ, डॉ. गडद, डॉ. डुमगोळ, शेट्टी, डॉ. वॉली यांच्याहस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
बारा आरोग्य केंद्रातील आकडेवारी बेळगुंदी 4804 (97 टक्के), भेंडिगेरी 2750 (97 टक्के), हंदिगनूर 2415 (96 टक्के), हिरेबागेवाडी 3049 (94 टक्के), हुदली 3705 (94 टक्के), कडोली 2815 (94 टक्के), किणये 6846 (97 टक्के), मुतगा 2650(96 टक्के), सुळेभावी 3155 (94 टक्के), उचगाव 3165 (99 टक्के), वंटमुरी 3677 (96 टक्के), येळ्ळूर 2229 (91 टक्के).









