प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मोसमी वारे वाहू लागले आहेत. यामुळे बेळगावसह काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरण असताना देखील थंडीने मात्र नागरिकांमध्ये हुडहुडी भरली. मागील चार दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही प्रमाणात थंडी गायब झाली होती. आता पुन्हा थंडीची चाहूल लागली आहे.
शुक्रवारी बेळगावचे कमाल तापमान 29.8 अंशावर तर किमान तापमान 16.8 अंशावर आहे. त्यामुळे थंडीची पुन्हा एकदा चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यावषी मळणी व पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीही निर्धास्त बनला आहे. थंडीसाठी कोणकोणते उबदार कपडे खरेदी करायची याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हिवाळी वातावरणात आतापर्यंत दोन ते तीन वेळा पावसाचे आगमन झाले आहे. आकाशात ढगाळ वातावरण आले की थंडीचा जोर ओसरतो. यामुळे नागरिकांना थंडीची जाणीव अधिक प्रमाणात होताना दिसून येत नाही. मात्र यावेळी थंडीचे प्रमाण अधिकच असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव तालुक्मयात मागील काही दिवसांपासून वातावरण बदलामुळे नागरिकांना फटका बसला आहे. अनलॉकनंतर नागरिक घराबाहेर पडत असताना आता वातावरण बदलाचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे कधी एकदा कोरोनापासून मुक्त होतो असेच सार्वांना वाटू लागले आहे. कमाल तापमान 29.8 व किमान तापमान 16.8 झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा थंडीची चाहूल लागत आहे.









