बेळगाव/प्रतिनिधी
बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्याला अनेक दिवसापासून लागून राहिलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट आहे. २४ ऑगस्ट ही अर्ज पडताळणीची तारीख असणार आहे. तर अर्ज माघारी २६ ऑगस्ट रोजी घेता येणार आहेत. दरम्यान, पालिकेची ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असुन ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.