प्रतिनिधी/ बेळगाव
विजेच्या वाहिन्या जोडता जोडता त्याने थेट संगीत क्षेत्राशी आपला श्वास जोडला. नोकरी करीत असतानाही त्याने आपली संगीताची आवड जोपासली. त्यामुळेच झी कन्नड या वाहिनीवरील ‘सारेगमप’च्या अंमित फेरीपर्यंत त्याने मजल मारली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किरण राजू पाटील असे त्या तरुण लाईनमनचे नाव आहे. बेळगाव तालुक्मयातील भुतरामहट्टी या गावचा असणारा किरण 3 वर्षांपासून हेस्कॉममध्ये ज्युनिअर लाईनमन म्हणून कार्यरत आहे. हेस्कॉम ग्रामीणच्या यमनापूर सेक्शनमध्ये तो सेवा करीत आहे. गाण्याची आवड असल्याने तो बेळगावमधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत होता.
सारेगमपच्या 17 व्या सीझनसाठी त्याने ऑडीशन दिली होती. त्यामध्ये त्याची निवड झाली होती. त्यानंतर आता त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्याला आता बेळगावच्या जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे.









