आंतरराष्ट्रीय पॉप स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती बेयॉन्सेच्या घरातून कोटय़वधींची मालमत्ता चोरीला गेली आहे. लॉस एंजिलिस येथील बेयॉन्स्sच्या घरातून चोरांनी 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 7 कोटींहून अधिक मूल्याची मालमत्ता लंपास केली आहे.

चोरांनी बेयॉन्सेचे महागडे हँडबॅग्स आणि कपडे चोरले आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. बेयॉन्सेपूर्वी अमेरिकन गायिका-अभिनेत्री माइली सायरसच्या घरातही चोरीचा प्रकार घडला होता. चोरांनी माइलीचे कपडे, फॅमिली फोटो आणि स्मृतिचिन्हांची चोरी केली होती.
बेयॉन्सेने अलिकडेच आयोजित ग्रॅमी पुरस्कार सोहळय़ात इतिहास रचला होता. तिने गॅमीमध्ये स्वतःच्या नावावर 4 पुरस्कार केले होत. याचबरोबर सर्वाधिक 28 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी ती पहिली गायिका ठरली होती.









