ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बेटी बचाव, बेटी पढाव योजनेला चांगल यश मिळाला आहे. तसेच मुलांपेक्षा शाळेत जाणाऱया मुलींच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. 98 टक्के मुली नर्सरी शाळेत जात आहेत. मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा मागे नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
पोषण आहार योजनेसाठी 35 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी 85 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जमातींच्या विकासासाठी 53 हजार 700 कोटीची तरतूद केलेली आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी 9 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.









