बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विद्यापीठात बीकॉम परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बीकॉमच्या अंतिम वर्षाची परीक्षा शनिवारी १७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजता बी.कॉमची परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तासापूर्वी पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेला बसलेल्या ७०० महाविद्यालयांमधील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षेसाठी २०५ केंद्रे तयार केली गेली आहेत.
बेंगळूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. के. आर. वेणुगोपाल यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावर पेपर फुटल्याची माहिती मिळाली. लीक झालेली प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात जुळली तेव्हा पेपर फुटल्याची खात्री झाली. त्यानंतर परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली असे सांगितले.
प्रा. वेणुगोपाल यांनी परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पाठविली गेली. परंतु कुठूनही पेपर फुटू शकतो. याप्रकरणी सायबर क्राइम पोलीस तपास करत आहेत अशी माहिती दिली.