बेंगळूर/प्रतिनिधी
नाटककार आणि चित्रपट अभिनेते एच. जी. सोमशेखर राव यांचे बेंगळूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी श्रीनगर भागात राहत्या घरी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अमे मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
चित्रदुर्गातील मूळ रहिवासी असलेले एच. जी. सोमशेखर राव १९६० च्या दशकात म्हैसूरच्या कॅनरा बँकेत नोकरी करत असताना त्यांना त्या काळात अभिनय व नाट्यसंग्रहाची आवड निर्माण झाली. नंतर ते बेंगळूरला गेल्यानंतरही ते आपल्या आवेशाने पुढे जात राहिले. त्यांनी ३०० हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे.