9 जणांचा मृत्यू 344 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
बुधवारी कोरोनामुळे 9 जणांना जीव गमवावा लागला असून 641 नवे रुग्ण बाधित झाले आहेत, तर 344 जण कोरोनामुक्त झाले आहे. एकूण बळींची संख्या आता 428 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 33418 झाली असून त्यातील 28125 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 4865 एवढी झाली असून ते विविध हॉस्पिटल, कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
बुधवारी 73 जणांना संशयित म्हणून गोमेकॉत भरती करण्यात आले तर 413 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. बुधवारी 2018 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी 641 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
बुधवारी झालेल्या 9 मृतांपैकी 4 जणांचा गोमेकॉत जीव गेला तर 4 जणांचा ईएसआय हॉस्पिटल मडगाव येथे मृत्यू झाला. उत्तर गोवा जिल्हय़ातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एकाने प्राण सोडला, अशा प्रकारे एकूण 9 जणांचे बळी गेले.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 187, सांखळी 294, पेडणे 144, वाळपई 151, म्हापसा 258, पणजी 311, हळदोणा 109, बेतकी 103, कांदोळी 138, कासारवर्णे 55, कोलवाळ 72, खोर्ली 208, चिंबल 180, शिवोली 188, पर्वरी 383, मये 40, कुडचडे 78, काणकोण 132, मडगाव 333, वास्को 269, बाळ्ळी 61, कासावली 117, चिंचणी 62, कुठ्ठाळी 254, कुडतरी 50, लोटली 74, मडकई 62, केपे 71, सांगे 100, शिरोडा 32, धारबांदोडा 91, फोंडा 176, नावेली 79. गोव्यात विविध मार्गाने आलेल्या तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
- 30 सप्टेंबरपर्यंतचे कोरोना रुग्ण 33418
- 30 सप्टेंबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 28125
- 30 सप्टेंबरपर्यंतचे सक्रिय रुग्ण 4865
- 30 सप्टेंबरचे कोरोना रुग्ण 641
- 30 सप्टेंबरचे बरे झालेले रुग्ण 344
- 30 सप्टेंबरचे कोरोना बळी 9
- आतापर्यंतचे एकूण बळी 428









