प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात 31 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 439 वर पोहोचली असून 500 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अथणी व बेळगाव तालुक्मयात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.
राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बाधितांचा बुधवारचा आकडा 27 असला तरी प्रत्यक्षात 24 तासात 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात 11, अथणी तालुक्मयात 10, गोकाक तालुक्मयात 5, सौंदत्ती तालुक्मयात 3 व रामदुर्ग तालुक्मयात 2 अशा एकूण 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उज्ज्वलनगर, वंटमुरी कॉलनी, भारतनगर-शहापूर, नेहरुनगर, वीरभद्रनगर येथील बाधितांचा यामध्ये समावेश आहे. हनुमाननगर येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांना कोरोनाची बाधा झाली असून रामदुर्ग, अथणी, गुजनाळ (ता. गोकाक), पांगिरे (ता. चिकोडी), गोकाक तालुक्मयातील खणगाव, सिंदीकुरबेट देवगोंडनहट्टी, दुरदुंडी येथील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या 24 तासात सहाहून अधिक जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून प्रशासनाला त्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. गेल्या 24 तासात अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 31 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतेक जणांना संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचा उलगडा झाला नाही. यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी चक्रावले आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्हय़ातील 342 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 94 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 2467 अहवालांची प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारने संस्थात्मक क्वारंटाईन रद्द केल्यामुळे वेगवेगळय़ा लॉजमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या संशयितांची स्वॅब तपासणी वाढविण्यात आली आहे. यापुढे परराज्यांतून येणाऱयांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजाणी करण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस अधिकाऱयांनी कंबर कसली आहे.
औषध दुकानदाराला लागण
उपलब्ध माहितीनुसार रामदुर्ग तालुक्मयातील एका औषध दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी सुरेबान (ता. रामदुर्ग) येथील 51 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले
बाळंतिण क्वारंटाईनमध्ये
अत्याचार प्रकरणात गर्भवती झालेल्या व चार दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या बाळंतिणीला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. यरगट्टी परिसरात राहणाऱया या 18 वषीय तरुणीने 5 जुलै रोजी एका स्त्राr जातीच्या अर्भकाला जन्म दिला होता. बुधवारी दुपारी त्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणीला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. स्वॅब तपासणी अहवालानंतर तिला कोरोनाची बाधा झाली आहे का? हे स्पष्ट होणार आहे.









