वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या वापरकर्त्यांच्या फोनवर टीव्ही पाहण्याची सुविधा देत आहेत. रिलायन्स जिओ टीव्हीप्रमाणेच व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी व्होडाफोन प्ले आणला आणि एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एअरटेल एक्सट्रीम आणली. आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल देखील या शर्यतीत सहभागी झाली आहे. बीएसएनएलने काही आठवडय़ांपूर्वी बीएसएनएल टीव्ही सेवा सुरू केली आहे. आता बीएसएनएलचे प्रीपेड ग्राहकही बीएसएनएल टीव्ही अŸपद्वारे अमर्यादित चित्रपटांचा आनंद घेऊ शकणार आहेत.
बीएसएनएलचा टीव्ही अŸप सध्या प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने पोस्टपेड ग्राहकांना ही सुविधा अद्याप दिली नाही. बीएसएनएलने एसटीव्ही 97, एसटीव्ही 365, एसटीव्ही 399, एसटीव्ही 997, एसटीव्ही 998 आणि एसटीव्ही 1999 या प्लॅनमध्ये विनामूल्य बीएसएनएल टीव्ही उपलब्ध करून दिली आहे.
बीएसएनएल टीव्ही ऍप काय आहे?
हिंदी, पंजाबी, हरियाणवी, उडिया, भोजपुरी आणि बंगाली यासह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हे ऍप उपलब्ध आहे. थेट टीव्ही पाहण्याची सुविधा यात उपलब्ध नाही. बीएसएनएलच्या ठराविक प्लॅन असलेल्या वापरकर्त्यांना अŸपवर लॉग इन करण्यासाठी ओटीपी मिळेल. लॉग इननंतर पसंतीची भाषा निवडून विनामूल्य टीव्ही पाहता येईल.









