नवी दिल्ली
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये थेट विदेशी गुंतवणूक 19 टक्के इतकी वाढून 59.64 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. सदरची वाढ ही वर्षाच्या आधारे गणली जात आहे. सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे सदरची विदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत झाली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2019-20 वर्षात थेट विदेशी गुंतवणूक 49.98 अब्ज डॉलर्स इतकी होती. थेट विदेशी गुंतवणूक करण्यात 29 टक्के वाटय़ासह सिंगापूर हा देश अग्रस्थानी राहिला आहे.









