सीबीआयसीकडे प्रस्ताव सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकार बिटकॉईन ट्रेडवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) आकारण्याचा प्रस्ताव आणण्यावर विचार करत आहे. देशामध्ये बिटकॉईन ट्रेड वर्षाला जवळपास 40,000 कोटी रुपयांचा आहे. अर्थ मंत्रालयाच्या एक विभागाने सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजेन्स ब्युरो (सीइआयबी)ने बिटकॉईन ट्रेडवर जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड (सीबीआयसी) यांच्याकडे पाठवून दिला आहे.
सीइआयबीने आपला प्रस्तावात म्हटले आहे, की बिटकॉईवर जीएसटी आकारणीतून सरकारला वर्षाला 7,200 कोटी रूपये प्राप्त होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार बिटकॉईनया क्रिप्टोकरेंन्सीला महत्व मिळत आहे. या चलनाच्या व्यापारात लाभही मोठा आहे. त्यामुळे त्यावर जीएसटी लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत क्रिप्टोकरेंसीसाठी कोणताही नियम तयार करण्यात आलेला नव्हते. आता मात्र हा व्यापार नियमबद्ध होण्याचे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.









