वार्ताहर / किणये
बिजगर्णी येथील महालक्ष्मी मंदिराचा लेंटल भरणी कार्यक्रम सोमवारी मोठय़ा उत्साहात झाला. प्रारंभी गावातील सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला मोठय़ा संख्येने कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर हे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून पुंडलिक जाधव हे होते. मनोहर मोरे यांच्या हस्ते लक्ष्मी देवी फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयवंत बाळेकुंद्री यांनी गणेश फोटो पूजन केले. ब्रह्मलिंग फोटो पूजन रामलिंग हलकर्णीकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. एच. पाटील यांनी केले. हनुमान फोटो पूजन जोतिबा मोरे यांनी केले.
निवृत्ती डुकरे, शट्टुप्पा तारीहाळकर, खाचू मोरे, डॉ. परशराम हुंदरे, विनायक जाधव, एम. व्ही. जाधव, सातेरी जाधव, सागर बाचीकर, प्रकाश कणबरकर, अमोल जाधव, पांडुरंग पाटील, मोनाप्पा तारीहाळकर, एम. व्ही. कांबळे, सावंत तारीहाळकर, शंकर तारीहाळकर, बबन मोरे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
लेंटल भरणीचे पूजन परशराम भास्कर, कृष्णा जाधव, निंगाप्पा जाधव, यल्लाप्पा जाधव, पांडुरंग मोरे, विजय भास्कर, सागर तारिहाळकर, सातेरी खांडेकर, मारुती गावडे, केदारी हलकर्णीकर, सागर अष्टेकर, बाबासाहेब गायकवाड आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कावळेवाडी येथील ज्ये÷ कवि वाय. पी. नाईक, हे उपस्थित होते. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









