प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यातील तडवळे येथे भोगावती नदीवर कोल्हापूर पध्दतीचा सर्वात मोठा बंधारा असून या बंधाऱ्याला ७२ दरवाजे आहेत हा बंधारा १९९३ साली बांधलेला आहे झालेल्या परतीच्या दमदार पावसामूळे ढाळे पिंपळगाव व हिंगणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुटलेल्या सांडीमुळे भोगावती नदी दूथडी भरून वहात आहे.
तडवळे बंधाऱ्याला सात सात दारे टाकल्यामूळे व आलेल्या महापुरामुळे व बांधारा तूंडूब भरल्यामूळे बंधाऱ्यावरून मोठयप्रमाणात पाणी वाहिल्यामूळे संरक्षक लोखंडी कठडा तूटून पडला आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला आहे त्यामूळे बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला असून पाटबंधारे विभागाने त्यांची ताबडतोब दुरूस्ती करावी अशी मागणी सरपंच रिता लोखंडे यांनी केली आहे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्यामूळे वाहतूक बंद झाली आहे या बंधाऱ्यावरूनच मनगोली , धानोरे , मानेगाव , भैरववाडी या गावांची वाहतूक चालते. संबंधीत विभागाने याकडे लक्षं द्यावे व ताबडतोब दुरूस्ती करावी नाही तर बंधाराच वाहून जाईल अशी भिती निर्माण झाली आहे.
Previous Articleपरतीच्या पावसात वाहून गेलेल्या स्विफ्टचा पोलिसांनी लावला छडा
Next Article संरक्षक भिंत खचल्याने करुळ घाटमार्ग बंद









