आफ्रिकेतील देश रवांडामधील अजब प्रकार
रवांडा या देशाची राजधानी किगाली येथील बार खुले झाले असून तेथे लोकांची गर्दी देखील होतेय. पण येथील बारमध्ये मद्य पुरविले जात नाही, तर ग्राहकांना दूध देण्यात येते. तेथे टॅपमध्ये बियरच्या जागी दूध प्राप्त होते. येथील लोक स्वतःचे कुटुंब, मित्र आणि एकटे बसून दूधाचा आनंद घेतात.
किगालीमध्ये लोक बारमध्ये जाऊन जवळपास प्रतिदिन दूध पितात, ही बाब त्यांच्या परंपरेचा हिस्सा ठरली आहे. रवांडामध्ये दूध एक प्रिय पेय आहे. मिल्क बारमध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येत असल्याचे दिसून येते. पुरुष आणि महिला दिवसभर बेंच आणि खूर्चींवर बसल्याच दिसून येते. त्यांच्यासमोर काचेच्या मगमध्ये अनेक लिटर दूध किंवा योगर्टसारखे दूध ठेवले जाते. याला स्थानिक स्वरुपात ‘इकीवयुग्युटो’ म्हणून ओळखले जाते.

लोक स्वतःच्या पसंतीनुसार गरम किंवा थंड दूध पितात. अनेक जण स्वतःचा कप एकाचवेळी संपविण्याची जुनी प्रथा पार पाडतात. तर इतर जण केक, बेड आणि केळी यासारख्या अन्य गोष्टींसोबत हळूहळू दूध पिणे पसंत करतात. मागील एक दशकात मिल्क बार सर्वत्र खुले झाले आहेत.
दूध या देशाची संस्कृती, इतिहास आणि ओळखीशी निगडित आहे. 1994 मध्ये देशात झालेल्या नरसंहारात सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तुत्सी समुदायाच्या लोकांचे प्रमाण अधिक होते. ऐतिहासिक स्वरुपात त्सुसी समुदाय हा गुरे पाळणारा म्हणून ओळखला जातो. नरसंहारातून सावरताच रवांडाच्या सरकारने गायींना पुन्हा अर्थव्यवस्था विकसित करणे आणि कुपोषणाशी लढण्याचा सर्वोत्तम स्रोत म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती.
‘मिली’च्या चित्रिकरणासाठी जान्हवी देहरादूनमध्ये
अभिनेत्री जान्हवी कपूर स्वतःचे वडिल बोनी कपूर यांच्या ‘मिली’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी देहरादून येथे आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत देहरादून अन् ऋषिकेशमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण चालणार आहे.
चित्रपटात जान्हवीची व्यक्तिरेखा एका रेस्टॉरंटमध्ये पार्टटाइम काम करणाऱया युवतीची आहे. बोनी कपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर लगेच मुंबईत परतले होते. तर जान्हवी आणि अभिनेता सनी कौशल 2 नोव्हेंबरपर्यंत चित्रिकरण पूर्ण करणार आहेत. मुंबईतून 250 जणांचे पथक चित्रिकरणाकरता दाखल झाले आहे. कोरोना चाचणी वारंवार होत रहावी म्हणून मुंबईतून 12 जणांचे पथकही पोहोचले आहे.
मिली हा चित्रपट मल्याळी चित्रपट ‘हेलेन’चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट बापलेकीच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटातील जान्हवीच्या व्यक्तिरेखेच्या आईच्या भूमिकेसाठी देहरादूनमधील स्थानिक कलाकाराचीच निवड करण्यात आली आहे. जान्हवीने देहरादून येथील स्वतःची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.









