प्रतिनिधी/ म्हापसा
उत्तर गोव्यातील साळगाव टेकडीवरील प्रक्रिया प्रकल्पानंतर दक्षिणेतील लोकांच्या सोयीसाठी बायंगिणीत (तिसवाडी-तालुका) उभारण्यात येत असलेल्या 250 टन कचरा प्रकल्पासाठी लागणारा पर्यावरण मंडळाचा ना हरकत दाखला अखेर गोवा कचरा व्यवस्थापन खात्याला मंजूर झाल्याने या प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचे कळंगुटचे आमदार तथा गोवा कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.
हा कचरा प्रकल्प बायंगिणीत येऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी या कचरा प्रकल्पास तीव्र विरोध दशविला होता. इतकेच नव्हे तर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या नेतृत्वाखाली हा कचरा प्रकल्प बायंगिणीमध्ये कदापी येऊ देणार नाही असा गंभीर इशारा सरकारला देण्यात आला होता. मात्र त्यांच्या विरोधात न डगमगता कचरा व्वस्थापन महामंडळाने आम्ही कोण्तयाही परिसअथितीत हा अत्याधुनिक पद्धतीचा प्रकल्प बायंगिणीतच उभारणार असे धोरण आखले होते. या विरोधात येथील नागरिकांनी न्यायालयात धाव घेण्याचे इशाराही दिला होता. मात्र आता पर्यावरण महामंडळाने या प्रकल्पात हिरवा कंदील दाखविल्याने हा कचरा प्रकल्प उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा प्रकल्प अद्यानुनिक पद्धतीचा असून याचा कुणालाही त्रास होणार नाही अशी माहिती मयाकल लोबो यांनी पत्रकारांना दिली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकीर्दीत राज्यातील कचऱयाची भिषण समस्या कायमची नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्याच पुढाकाराने कचरा व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार उत्तरेतील 100 टन क्षमतेचा साळगाव कळंगुटच्या सिमेवर कचरा प्रकल्प उभारण्यात आला. आजच्या घडीस येथील प्रकल्पात बार्देशातील एकूण 27 पंचायती तसेच पणजी महानगरपालिकेचा 15 टन कचऱयावर येथील प्रकल्पात नियमित प्रक्रिया होत असते. दक्षिणेतील काकोडा येथील कचरा प्रकल्पाची नुकतीच पायाभरणी करण्यात आलेली असून येथील प्रकल्पासाठी लागणारा खर्च 189 वरून 173 कोटींवर स्थिर झाल्याची माहिती यावेळी मंत्री लोबो यांनी दिली. हा नियोजित प्रकल्प ठरलेल्या मर्यादित वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. केबीनेटची मंजुरी मिळताच येथील प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोबो यांनी दिली.
साळगांव कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा घेतल्याने मध्यंतरी दुर्गंधीची समस्या उद्भवली होती मात्र यापुढे अशी समस्या उद्भवणार नसल्याची खात्री मंत्र्यांनी दिली. बायंगिणीत उभारण्यात येणारा कचरा प्रकल्प बा जर्मन तसेच नॉर्वेच्या धर्तीवर होणार असल्याने गोवा राज्य कचरामुक्त करण्याचा आपला निर्धार असल्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.









